माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

31 January 2024

माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

                  

उद्घाटक दयानंद काणेकर व्यासपीठावर बोलताना. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. उद्घाटक व प्रमुख पाहुणे उद्योजक दयानंद काणेकर यांनी विद्यार्थी जीवनात अनुशासनाचे महत्त्व असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पाडाव्यात. स्वतःमधील कौशल्यांचा विकास करावा असे आवाहन केले. प्रा. आर. पी. पाटील यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच भविष्यात  उदयोन्मुख खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.  

    

उदयोजक दयानंद काणेकर महाविद्यालयास धनादेश प्रदान करताना.

         अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी निरामय आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे बळकट शरीर आणि खंबीर मन हीच होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.

      उद्योजक काणेकर हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. म. गांधींच्या पुण्यतिथी निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ॲड. आर. पी. बांदिवडेकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केल्यावर खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानातून फिरवली व सर्वांना खिलाडू वृत्तीचा संदेश दिला. महाविद्यालयाची खेळाडू सुप्रिया पाटील हिने सर्वांना क्रीडाशपथ दिली. यावेळी विद्यापीठ पातळीवर तसेच अन्य स्पर्धेमध्ये लक्षणीय यश संपादन करणारे महाविद्यालयाचे खेळाडू अभिनव घुरे, अनिकेत कुट्रे, बाबू गावडे, रणजित गडदे, निकीता नार्वेकर, कविता परब, आकाश गावडे यांचा सन्मान करण्यात आला. एस.व्ही. गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले.

       क्रीडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले. आभार ए. डी .कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास एल. डी. कांबळे, आर. पी. बांदिवडेकर यांच्यासह आर. पी. बांदिवडेकर, प्राचार्य एन. डी. देवळे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारा बरोबरच पावर लिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment