कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित संत तुकाराम हायस्कूल सुंडी या माध्यमिक शाळेत आज शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी माता पालक व हळदीकुंकू समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शंकर दत्तू घोळसे व प्रमुख वक्ते म्हणून सौ. प्रमिला कुंभार प्राथमिक शिक्षिका श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मलतवाडी या होत्या.
सौ. प्रमिला कुंभार म्हणाल्या, ``किशोरवयीन मुला-मुलींच्या पालकत्वावर विशेष भर दिला. मुलांच्यावर अधिक बंधने लादल्यास मुले बिघडू शकतात. तेव्हा त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. तसेच विध्यार्थ्यांचा आरोग्याकडे, योगाकडे अधिक लक्ष द्यावे असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात विध्यालयाचे सहाय्यक शिक्षक पी. एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाकोबा पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन बी. व्ही. केसरकर यांनी केले. आभार एम. के. भुजबळ यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष एन. एम. पाटील व उपाध्यक्ष झी. नी. पाटील हे होते. तसेच कमिटी सदस्य तानाजी नारायण टक्केकर, सौ. निता निवृत्ती पाटील, उपसरपंच सौ. शुभांगी पाटील, सदस्या सौ. संजीवनी पाटील, सौ माधुरी पाटील, सौ. सारिका पाटील या कार्यक्रमाच्या प्रायोजक सौ. माधुरी टक्केकर, तसेच गावातील सर्व बचत गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव तसेच बहुसंख्येने माता पालक, सुंडी, महिपाळगड, करेकुंडी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment