किटवाड ग्रामपंचायतीची बक्षीस योजना चर्चेत, काय आहे उपक्रम....! - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2024

किटवाड ग्रामपंचायतीची बक्षीस योजना चर्चेत, काय आहे उपक्रम....!

लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना मान्यवर

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
    किटवाड (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत तसेच मराठी विद्या मंदीर  ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. सरपंच संगीता दशरथ सुतार यांच्या हस्ते ध्वज पूजन झाल्यानंतर गावातील निवृत्त पोलिस अधिकारी मनोहर ओऊळकर व विठ्ठल नांदवडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 
      यावेळी ग्रामपंचायत किटवाडच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या बक्षीस योजनेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीने नियोजित वेळेत घरपट्टी भरणाऱ्या खातेदारांना लकी ड्रॉ ठेवला होता. त्याची सोडत सर्वांसमोर काढण्यात आली. यात दुध्दाप्पा पाटील, पुंडलिक पाटील, शंकर कसलकर, रामू खंडाळकर, नारायण जाधव, कृष्णा पाटील विजेते ठरले. त्यांना मिक्सर, कुकर, स्टील पिंप, हंडा, बादली, कळशी अशी बक्षिसे देण्यात आली. यावेळी मराठी विद्या मंदिर च्या मुलांनी सादर केलेली देशभक्ती गीते व लेझीम प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. यावेळी उपसरपंच महेश शिवाजी पाटील, ग्रामसेवक निळकंठ सांबरेकर, मुख्याध्यापक जानबा अस्वले ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन, तंटामुक्त कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment