श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची पतसंस्थाच्या अध्यक्षपदी नामदेव कांबळे, उपाध्यक्षपदी पी. वाय. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2024

श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची पतसंस्थाच्या अध्यक्षपदी नामदेव कांबळे, उपाध्यक्षपदी पी. वाय. पाटील

 


चंदगड (प्रतिनिधी) दि.22 

    चंदगड येथील श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सह. पतसंस्था मर्यादित चंदगड या पतसंस्थेची नुकताच बिनविरोध निवड झाली. या संचालक मंडळाची बैठक घेवून अध्यक्ष व उपाध्यक्ष खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष संजय कल्लाप्पा भोगण अध्यक्षस्थानी होते. 

    यावेळी उपस्थित नूतन संचालक मंडळ, सल्लागार व तज्ञ संचालक यांचे मानद सचिव  सुभाष भोसले यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले.

 संचालक मंडळातून आडीच वर्षाकरिता आदर्श विद्यालय कामेवाडी येथील शिक्षकेत्तर कर्मचारी नामदेव दत्तू कांबळे यांची पंतसंस्थेच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष संजय भोगण यांनी सुचक तर एम. बी. पाटील यांनी अनुमोदन दिले.

 न. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेज कारवे येथील अध्यापक पुंडलिक यादू पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी सुचक व्ही. एस. कोले तर पुंडलिक विष्णू सुतार यांनी अनुमोदन दिले.

संचालक मंडळाने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन संचालक विठ्ठल कृष्णा गावडे, तानाजी सटुप्पा चांदेकर, रमेश कृष्णा पाटील, रमेश जानबा पाटील, राजाराम गाडीवड्डर, अश्विनी देवण, अर्चना रेळेकर व तज्ञ संचालक तानाजी बेरडे, परशराम पवार व सल्लागार रविंद्र पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment