माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वीकारताना भरमू पाटील सोबत मान्यवर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
भारतीय जनता पक्ष प्रणित 'पंचायत राज व ग्रामविकास' विभागाच्या तालुका संयोजक पदी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील भाजप कार्यकर्ते भरमू तातोबा पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र जिल्हा संयोजक सुरेखा मिलिंद पाटील- नांगरे यांनी भाजप पंचायतराज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नुकतेच भाजप कार्यालय कोल्हापूर येथे प्रदान केले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, नारायण सोनुर्ले, शिवाजी गावडे, नागेश मेणसे, शंकर भेकणे, हरिबा सुतार, जानबा पाटील व भाजपचे जिल्हा स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
भरमू पाटील यांनी गेल्या काही वर्षात विविध पदांवर काम करत असताना भाजप पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment