ट्रॅक्टर खाली सापडून हाजगोळीतील शेतकऱ्याचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2024

ट्रॅक्टर खाली सापडून हाजगोळीतील शेतकऱ्याचा मृत्यू

पांडुरंग कनगुटकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      चंदगड तालुक्यातील हजगोळी गावचे शेतकरी नारायण पांडुरंग कनगुटकर वय  ५५ यांचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला. कनगुटकर हे १ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या शेतात ट्रॅक्टर खाली सापडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी केएलई रुग्णालय बेळगाव येथे दाखल करण्यात आले होते. तथापि उपचार सुरू असताना दि. ५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती वैद्यकीय अधिकारी केएलई रुग्णालय बेळगाव यांनी चंदगड पोलिसात दिली असून पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोगेकर हे अधिक तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment