चंदगड येथे १० रोजी शिवपुतळा व शिवशक्ती स्थळ लोकार्पण सोहळा; ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2024

चंदगड येथे १० रोजी शिवपुतळा व शिवशक्ती स्थळ लोकार्पण सोहळा; ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजनचंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      चंदगड शहरात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारकाचे लोकार्पण १० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मंत्री ना. हसन मुश्रीफ,ना. चंद्रकांत दादा पाटील, ना. धनंजय मुंडे, खा. संजय मंडलिक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खा. धनंजय महाडिक यांच्यासह आमदार सतेज पाटील, आम. प्रकाश आबिटकर, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, संग्राम कुपेकर, गोपाळराव पाटील, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, शौमिका महाडिक, नितीन चौगुले, मूर्तिकार प्रभाकर डोंगरसाने उपस्थित राहणार आहेत.
     लोकार्पण सोहळ्यानिमित्त चंदगड शहरात दि. ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सकाळी ९ ते १२ शिवशक्ती स्थळ वास्तुशांती, दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता जलाभिषेक व छत्रपती संभाजी महाराज चौकात कलश आगमन, दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता आम्ही कोल्हापुरी ढोल ताशा पथकाच्या गजरात कलश मिरवणूक प्रारंभ, दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जलाभिषेक सोहळा होणार असून यावेळी छत्रपती खा. उदयनराजे भोसले, शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे, रा स्व संघ विभागीय सदस्य मुकुंद भावे, विहिंप चे संभाजीराव साळुंखे, शिवप्रसाद व्यास, कैलास काइंगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायं. ६  वाजता शिव वंदना, सायं साडेसात वाजता शाहीर देवानंद माळी (सांगली) यांच्या शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम. दि. १० रोजी सकाळी ११ वाजता सव्यासाची गुरुकुलम मर्दानी युद्ध कला प्रात्यक्षिके, दुपारी २ वाजता शिव पुतळा व शिवशक्ती स्थळ लोकार्पण मुख्य कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता शिव वंदना, साडेसहा वाजता भव्य लेझर लाईट शो, सायंकाळी सात वाजता शिव भंडारा व महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक व शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन छ. शिवाजी महाराज कला क्रीडा मंडळ व चंदगड ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष अनिकेत घाटगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment