हलकर्णी येथील पोल्ट्री फार्म धारकाचे मोटर पंप व साहित्य चोरट्यांकडून लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2024

हलकर्णी येथील पोल्ट्री फार्म धारकाचे मोटर पंप व साहित्य चोरट्यांकडून लंपास




चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

हलकर्णी (ता. चंदगड) येथील सचिन पुंडलिक सावंत या पोल्ट्री फार्म धारकाच्या शेतातून अज्ञात चोरट्याने बोरवेल मोटर तसेच मोटरसह सोडलेली पाईप, रस्सी, केबल आदी साहित्य लंपास केले आहे. याबाबत ची फिर्याद चंदगड पोलिसात नोंद झाली आहे. 

  याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी सचिन सावंत यांनी दिनांक १ ते २ फेब्रुवारी दरम्यान मुरली टी एन यांच्या मालकीच्या हलकर्णी हद्दीतील शेतात वरील साहित्य ठेवले होते. ते दिनांक ५ गायब झाल्याचे दिसून आले. यात त्यांची ८ हजार रुपये किंमतीची टेस्कमो कंपनीची दोन एचपी बोरवेल ची मोटर, दीड इंची ३०० फूट लांबीची अस्थी प्लास्टिक पाईप असा सुमारे १६ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने वरील साहित्य चोरून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment