होसुर येथे कै. ना. सी. पाटील यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2024

होसुर येथे कै. ना. सी. पाटील यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार



कुदनूर : सी एल वृत्तसेवा
      नवयुग शिक्षण प्रसारक मंडळ होसुरचे कै. ना. सी. पाटील हायस्कूल येथे कै ना सि पाटील (तात्या) यांची ४२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कर्यात भागासह तालुक्यातील मान्यवर, तात्यांनी जोडलेले लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
       नारायण सिताराम पाटील होसूर येथील लाडके व्यक्तिमत्व होते. त्यांना गावात लोक तात्या या नावानेच ओळखत. गावच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. गावाची शैक्षणिक गैरसोय पाहून एस एल पाटील यांनी तात्यांच्या नावाने होसूर येथे माध्यमिक शाळेची स्थापना केली. यामुळे होसूरसह किटवाड, कौलगे, बुक्किहाळ खू, बुक्किहाळ बुद्रुक या गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. 
 एस एल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुबराव पवार यांनी कै ना सि पाटील यांच्या फोटोचे पूजन केले. तर पोलीस अधिकारी संजय कांबळे यांनी दीप प्रज्वलन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जे एस पाटील यांनी केले. विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीतानंतर सध्या वरीष्ठ पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील, रामू पाटील, सौरभ पाटील, विनोद कोकितकर आदींचा समावेश होता. क्रीडा, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्तकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या स्मिता डी भोसले यांनी किशोरी मेळावा याबाबत माहिती दिली. सुत्रसंचलन बी व्ही पाटील यांनी केले. पी व्ही पाटील यांनी आभार मानले. एम आर पाटील, डी एन पाटील, शिवाजी कालकुंद्रीकर, एम जी बाळेकुंद्री, जी एन पाटील, भरमा पाटील आदींसह शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, पालक, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment