चंदगड तालुका नाभिक समाज अध्यक्षपदी मारुती संकपाळ, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर न्हावी यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2024

चंदगड तालुका नाभिक समाज अध्यक्षपदी मारुती संकपाळ, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर न्हावी यांची निवड

मारुती  संकपाळ

                                                       
ज्ञानेश्वर न्हावी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुका श्री संतसेना नाभिक समाज सुधारणा मंडळ माणगांव तालुका चंदगडची वार्षिक सर्वसाधारण सभा नाभिक समाजाच्या मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी तालुका अध्यक्षपदी मारुती सुरेश संकपाळ, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भिकाजी न्हावी, चंदगड शहर अध्यक्षपदी राजाराम शिवनगेकर, उपाध्यक्षपदी श्री. लाटगांवकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

      सदर सभेमध्ये समाज हिताच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील दहावी-बारावी, विविध स्पर्धा परीक्षा, विविध खेळ प्रकारात निवड झालेल्या, ग्रामपंचायत निवडणुकीत निवड झालेल्या लोकप्रतिनिधींचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा संघटना, तालुका संघटना, पतसंस्था, चंदगड शहर, दुकान मालक संघटना व तालुका महिला आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, सभासद, जेष्ठ सल्लागार, पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment