बेळगाव येथील जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला एक सुवर्णसह एक कास्य पदक - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2024

बेळगाव येथील जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला एक सुवर्णसह एक कास्य पदक

 

भगतसिंग गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      आबा हिंद स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती यांच्यावतीने बेळगाव येथे पार पडलेल्या आंतर राज्य जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडे याने विविध प्रकारात एक सुवर्ण पदकासह एक कास्य पदक पटकावले.  त्याला रोख बक्षीस आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. 

    भगतसिंग यांने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि कास्य  पदके मिळवली आहेत. सध्या तो बेळगाव येथील केएलई स्विमिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या  कामी त्याला अजिंक्य मेंडके, अजित जेंटीकट्टी, राजेश शिंदे, अतुल धुडूम, श्री. इम्रान, सतीश यादव यांचे मार्गदर्शन तर, केएलई इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपूनगर बेळगाव रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर, प्रभाकर कोरे (अध्यक्ष केएलई सोसायटी) आणि उमेश कलघटगी यांनी पाठिंबा व प्रोत्साहन दिले. 

No comments:

Post a Comment