संविधान मोडीत काढणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण उमेदवारी स्वीकारली - छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन, चंदगड तालुक्यातील संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2024

संविधान मोडीत काढणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण उमेदवारी स्वीकारली - छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन, चंदगड तालुक्यातील संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संवाद यात्रेप्रसंगी बोलताना छत्रपती शाहू महाराज

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
       देशात समता बंधुत्वा नांदण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न आजच्या भाजप सरकारने सुरू केला असून गोरगरीब जनतेवरती सुरू असलेल्या अन्याय मला बघवत नसल्याने मी उमेदवारी स्वीकारले असल्याचे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज यांनी केले चंदगड तालुक्यातील अडकुर (ता. चंदगड) येथील संवाद यात्रेच्या दरम्यान ते बोलत होते. 
       प्रारंभी बाबासाहेब अडकुरकर यांनी प्रास्ताविक करून आपण सर्वसामान्य जनतेने समाजात सुरू असली भाजप सरकारची अराजकता मोडीत काढण्यासाठी संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत शाहू महाराज यांचे वारस छत्रपती शाहू महाराज यांना निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवण्याची विनंती केली.
 छत्रपती शाहू महाराज पूढे म्हणाले, महाराष्ट्र मध्ये फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन समाजाची उभारणी सुरू असताना भाजप सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न करून मोठी आराजगता माजवली असून गोरगरीब शेतकरी जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्याचे सत्र सुरू असताना मला ते बघावलं नसल्याने सर्वसामान्य जनतेने मला उमेदवारी स्वीकारण्याचे आवाहन केल्यानंतर मी उमेदवारी स्वीकारली आहे. मला समाजकारण आवडते राजकारणाचा मी कधीही विचार केला नसताना आज भाजप सरकार हा देश विकायला निघाला असल्याचे स्पष्ट चित्र होत असताना ते मला बघवत नसल्याने मी उमेदवारी स्वीकारले आहे असे प्रांजळ मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
      यावेळी बोलताना काँग्रेसचे गोपाळराव पाटील म्हणाले, इंडिया आघाडीच्या वतीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे व समाजातील जनतेला न्याय देणारे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचे वारस छत्रपती शाहू महाराज यांची निवड जनतेने केली आहे. त्यांनी उमेदवारी मागितली नाही पण जनतेच्या आग्रहाखातर ते निवडणूक रिंगणात आलेले आहेत. तेव्हा श्रीमंत शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा कायम ठेवण्यासाठी छं. शाहू महाराज यांना प्रचंड मताने चंदगड तालुक्यातील मताधिक्य द्यावे असे आवाहन केले.
      यावेळी बाबासाहेब आडकुरकर, बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, रामराजे कुपेकर, विजय देवणे, अमर चव्हाण, काँ. प्रा. सुभाष जाधव, चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी भाजप सरकारच्या सध्याच्या राजकारणाबद्दल टीकास्त्र सोडले. अडकुर, बुझवडे, चंदगड, हेरे, पाटणे फाटा या ठिकाणी आज संवाद यात्रा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर अंजनाताई रेडेकर, प्रा. एन. एस. पाटील, जी. बी. पाटील, राजू रेडेकर, विलास पाटील, पै. विष्णू जोशीलकर, विद्याधर गुरबे, अशोक पाटील, संजय पाटील, अमर चव्हाण, कलाप्पा भोगण, एम. जे. पाटील, किसन कुराडे, प्रभाकर खांडेकर, राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सावंत, स्वाती कोरी, माधव अडकुरकर, नंदकुमार ढेरे, जगन्नाथ इंगवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक जाधव यांनी केले तर आभार चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याचे समन्वयक सचिन घोरपडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment