शिक्षक संघ चंदगडच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2024

शिक्षक संघ चंदगडच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

चंदगड तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांना देताना शिक्षक संघाचे पदाधिकारी
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) शाखा चंदगडच्या पदाधिकाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांच्याशी चर्चा केली. यावेळी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्याची माहिती शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दिली. 
  यावेळी पुढील मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. १) आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षकांना  एक ज्यादा वेतन वाढ मिळावी, अशा  शिक्षकांनी ज्यादा वेतन वाढीचे प्रस्ताव द्यावे. २) तालुक्यातील शिक्षकांचे चटोपाध्याय फरक, मेडिकल बीले, प्रलंबित विविध फरक बिले काढणे. ३) हिंदी व मराठी भाषा विषय सूट मिळणे. ४) बहिस्थ शिक्षण परवानगी व सेवापुस्तकात नोंदी करणे. ५) तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रत्येक शाळेपर्यंत पोहचवणे. आदी विषयांवर चर्चा झाली. गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व बिले ३१ मार्च अखेर काढणार असल्याचे सांगितले. तसेच सेवा पुस्तकातील नोंदीसाठी एप्रिल महिन्यात कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले.
 यावेळी अध्यक्ष शिवाजी पाटील पदाधिकारी अनंत मोटर, अर्जुन चाळूचे, रमेश नाईक, महादेव सांबरेकर, संजय घोळसे, नित्यानंद हुद्दार, राजू हाजगोळकर, आप्पा रेडेकर आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment