लोकसभा निवडणुक २०२४ : उबाठा शिवसेनेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर, सांगलीतून पै चंद्रहार पाटील लढणार - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2024

लोकसभा निवडणुक २०२४ : उबाठा शिवसेनेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर, सांगलीतून पै चंद्रहार पाटील लढणार

चंद्रहार पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा तर देशात इंडिया आघाडीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना आधी घोषित केल्यामुळे प्रमाणे जाहीर झाली आहे. यामुळे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
   मिरज येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी २१ महाराष्ट्र केसरी तर ११ हिंदकेसरी पैलवानांनी स्टेजवर उपस्थित राहून महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. तेव्हापासून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी मुळे राज्यातील कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, मार्गदर्शक व पैलवान यांच्यामध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शहरातील ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई या तीन जागांसह दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केल्याने  मुंबईतील सहापैकी चार जागांवर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील.

  शिवसेना नेते संजय राऊत यांनी जाहीर केलेली उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- बुलढाणा- नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम- संजय देशमुख, मावळ- संजोग वाघेरे-पाटील, सांगली- चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)- चंद्रकांत खैरे, धाराशिव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाजे, रायगड- अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी- विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, ईशान्य मुंबई संजय दिना पाटील, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, वायव्य मुंबई- अमोल कीर्तिकर, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, परभणी- संजय जाधव या १७ उमेदवारांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment