भारतीय जनता पार्टी चंदगड तालुक्याच्या अल्पसंख्याक मोर्चा चंदगड उपशहर प्रमुखपदी युसुफ खेडेकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2024

भारतीय जनता पार्टी चंदगड तालुक्याच्या अल्पसंख्याक मोर्चा चंदगड उपशहर प्रमुखपदी युसुफ खेडेकर यांची निवड

युसुफ ईस्माईल खेडेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       "भारतीय जनता पार्टी चंदगड तालुक्याच्या अल्पसंख्याक मोर्चा चंदगड उपशहर प्रमुख पदी" चंदगड शहरातील युसुफ ईस्माईल खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. नेसरी येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात धनंजय महाडिक यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. 

निवडीचे पत्र देताना धनंजय महाडिक, शेजारी संग्रामसिंह कुपेकर, भरमूआण्णा पाटील व शिवाजीराव पाटील

       भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवणे. पक्ष विस्ताराचे काम मनस्वी करावे. पक्ष वाढीसाठी तसेच सशक्त संघटना निर्माण करण्यासाठी आपण काम करावे. पक्ष बांधणी मजबुत करुन प्रभावी कार्यद्वारे आपले गाव, तालुका व जिल्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावा. या साठी त्यांना हे पद देण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment