के. जे. पाटील यांच्या कवितासंग्रहाचे कालकुंद्री येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2024

के. जे. पाटील यांच्या कवितासंग्रहाचे कालकुंद्री येथे प्रकाशन

कवी के. जे. पाटील यांच्या 'काळजातला गाव' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील लेखक व कवी के जे पाटील यांच्या 'काळजातला गाव' या कवितासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच कालकुंद्री येथे करण्यात आले. भिमक्रांती सांस्कृतिक युवा मंच यांच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान व बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी सरपंच सौ. छाया राजाराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध व्याख्याते व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मधुकर जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

   यावेळी प्रा. विनायक कांबळे यांनी "काळजातला गाव" या कवितेचे वाचन केले. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. तालुक्यातील उदयोन्मुख साहित्यिक के. जे. पाटील यांचे यापूर्वी चार कथासंग्रह व एक कादंबरी प्रकाशित झाली आहे. याप्रसंगी सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक रामू पाटील, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, राजगोळी बु. चे पोलीस पाटील काशिनाथ कांबळे आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पी. के. कांबळे, जयवंत पाटील, शरद जोशी, पोलीस पाटील संगीता कोळी आदींसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment