ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत कोवाड केंद्र शाळेचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2024

ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत कोवाड केंद्र शाळेचे यश

विजयकुमार पोटेकर यांनी कोवाड केंद्र शाळेतील ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या तसेच परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन अभिनंदन केले, यावेळी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

      नुकत्याच संपन्न झालेल्या ऋणानुबंध प्रज्ञाशोध परिक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन यश संपादन केले आहे.

         इयता ३ री तील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे - श्रीतेज विजयकुमार पोटेकर (जिल्हास्तर गुणवंत), श्लोक भारत पाटील (जिल्हास्तर गुणवंत), आराध्या लक्ष्मण सुर्वे (तालुक्यात प्रथम), आराध्या अनंत भोगण (तालुक्यात पाचवा), वेदांत सुधीर कांबळे (केंद्रात प्रथम), सुविद्य जोतिबा आडाव (केंद्रात द्वितीय), आमना इसाक मुल्ला (केंद्रात चौथा) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गणपती लोहार, अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील (वर्गशिक्षक), अध्यापिका भावना अतवाडकर (वर्गशिक्षिका), मधुमती गावस, जयमाला पाटील यांचे मार्गदर्शन व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांचे प्रोत्साहन लाभले.

      सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातून आभिनंदन होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजयकुमार पोटेकर यांनी शाळेच्या या यशाबद्दल शाळेत भेट देऊन परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment