तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
आगामी काळात येणाऱ्या विविध सार्वत्रिक निवडणूकामध्ये मतदारानी मतदान करावे यासाठी अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजच्या वतीने अडकर येथे मतदार जनजागृती मोहिमे अंतर्गत पथनाट्य सादरीककरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण, प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, सरपंच सचिन गुरव आदि मान्यवर उपस्थित होते.
येथील धर्मवीर संभाजी चौकात विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून विविध गित गायन व अभिनय करत सुंदर असे पथनाटय सादर केले. वैष्णवी कदम या विद्यार्थांनीच्या नेतृत्वात'मतदार राजा जागा हो' लोकशाहीचा धाका हो ' दादा बाबा मावशी आऊ चला मतदानाला जाऊ अशा गितातून मतदारांची जनजागृती केली. यावेळी तहसिलदार राजेश चव्हाण यानी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तलाठी, ग्रामसेवक अडकूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सदस्य, श्री शिवशक्ती हायस्कूलचे सर्व विद्यार्थी व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व्ही. एन. सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी केले तर आभार प्रा. रामदास बिर्जे यांनी मानले.
No comments:
Post a Comment