पणजी : सी. एल. वृत्तसेवा
स्व. सौ. सुषमा सुभाष वेलिंगकर स्मृति प्रतिष्ठानचा पहिला वर्धापनदिन गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पाटो पणजी गोवा येथील कला व सांस्कृतिक भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून फोंडा येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डाॅ. अनिता संतोष तिळवे तर आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. कृष्णराव काशीनाथ संझगिरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून गोमंतकातील कर्तृत्ववान महिलांसाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी 'समाजमाता' पुरस्कार दिला जातो. यंदा स्व. सौ नलिनी पांडुरंग सामंत, म्हापसा (मरणोत्तर), स्व. श्रीमती सुनीता श्रीपाद नाईक, करमळी- तिसवाडी (मरणोत्तर), श्रीमती सुशीला रामदास बखले, मडगाव (मूळगाव- शिरोडा गोवा) व स्व. सौ. उपमा गोपाळ गावडे, दोडामार्ग (मरणोत्तर) या चार माता पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
डाॅ. अनीता तिळवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार असून न्यासातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या 'रुग्ण सेवा केंद्रा' चे उद्घाटन डाॅ. कृष्णनाथ संझगिरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या समाजाभिमुख सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन कार्यवाह सूर्यकांत लाडू गावस यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment