कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
नुकत्याच पार पडलेल्या 'ऋणानुबंध प्रज्ञाशोध (टॅलेंट सर्च) २०२४' परीक्षेत मराठी विद्या मंदिर कामेवाडी (ता. चंदगड) शाळेच्या बिंदू बाळू डांगे यांने ९४% गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय शाळेतील निकिता भरमाणी पाटील ९०% (जिल्ह्यात तिसरा), सुहानी सुरेश गोणी ८८% (तालुक्यात प्रथम), श्रावणी बसवराज कोळी ८८% (तालुक्यात प्रथम), आरोही सुनिल पाटील ८६% (तालुक्यात दुसरा), केतन अनिल पाटील व अनुज यल्लाप्पा पाटील ८०%, दृष्टी सिद्राम कोळी ७८% यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्वल केले.
कामेवाडी हे १००% कानडी बोलीभाषा असलेले गाव असूनही तेथील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे लक्षवेधी ठरणारे आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सागर पाटील यांच्यासह मुख्याध्यापक संजय दावणे, केंद्रप्रमुख बसवानी शिरगे व शिक्षक संजय सोनार, मारुती तळवार, विठ्ठल कांबळे, प्रभाकर राजगोळकर, युवराज पाटील आदींचे मार्गदर्शन तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पाटील व सदस्यांचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment