कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
बलभीम तालीम मंडळ व निट्टूर ग्रामस्थ यांच्यामार्फत आयोजित ८१ वर्षांची परंपरा असलेल्या निट्टूर (ता. चंदगड) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी दर्गा तालमीचा कर्नाटक चॅम्पियन पै. शिवानंद दड्डी विरुद्ध कवठेपिराण तालीमचा हिंदकेसरी मारुती माने यांचा पठ्ठा पै. सुनील करवते यांच्यात लढत रंगणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त दि. ९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता हे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान नरसिंह मंदिर शेजारील आखाड्यात आयोजित करण्यात आले आहे.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन कीर्ती कुमार बेनके कार्वे विरुद्ध प्रतिक मेहतर हनुमान आखाडा राशिवडे, याशिवाय अनुक्रमे विक्रम शिनोळी विरुद्ध आदित्य पाटील कवठेपिरान, रोहित कंग्राळी विरुद्ध गौस कुंदर्गी दर्गा तालीम बेळगाव, पार्थ कंग्राळी विरुद्ध अध्येयन एडके कवठेपिराण, चिन्मय येळ्ळूर विरुद्ध ओमकार पाटील राशिवडे, रोहित चव्हाण कवठेपिरान विरुद्ध साईनाथ नाईक कंग्राळी, प्रवीण निलजी विरुद्ध रोहन चव्हाण कवठेपिराण, विक्रम गावडे तुर्केवाडी विरुद्ध वैभव राशिवडे. गणेश कडोली विरुद्ध निशांत पाटील राशिवडे, सुमित कडोली विरुद्ध केदार मगदूम कवठेपिराण, अक्षय कडोली विरुद्ध शुभम पाटील तेऊरवाडी आदी ५५ लढतींशिवाय दरवर्षी मैदानाचे आकर्षण असलेली भीमा कुरबुर मलतवाडी (अनगोळ) यांच्यामार्फत मेंढ्यासाठी लावली जाणारी कुस्ती राहुल पैलवान बेळगाव विरुद्ध कार्तिक जाधव पैलवान निट्टूर यांच्यामध्ये रंगणार आहे. सर्व काटा जोड कुस्त्या कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडतील.
आखाडा पूजन व उद्घाटन माजी कुस्तीगीर नरसू गोपाळ पाटील तर फोटो पूजन भारत धोंडीबा पाटील- खवणेवाडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत.
कुस्त्यांचे धावते समालोचन कृष्णात चौगुले व हलगी सम्राट हनुमंत घुले यांची रणहलगी मैदानाचे आकर्षण असेल. आखाडा पंच म्हणून पै. मारुती गावडू पाटील, गावडू निंगापा पाटील, भैरू पाटील, नागोजी साळुंखे, भरमू पाटील, विजय वै पाटील, नरसू पाटील, कल्लाप्पा पाटील हे काम पाहणार आहेत. निवेदक म्हणून वाय. व्ही. कांबळे व के. के. पाटील हे काम पाहतील. होतकरू पैलवान व कुस्ती शौकिनांनी मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक पै. नेत्रपाल हडलगेकर, यल्लाप्पा चांगोजी पाटील, महादेव जोतिबा पाटील, बाळू शिवराम जाधव आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment