चंदगड : सी एल वृत्तसेवा
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या मोटर कारला अपघात होऊन चंदगड तालुक्यातील मलतवाडी (ता. चंदगड) गावचे सुभाष ईश्वर पाटील (वय ४८) हे ठार झाले. तर विलास लक्ष्मण लांडे हे जखमी झाले. हा अपघात आज दि. ३१ मे रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास घडला.
सुभाष पाटील हे लांडे यांच्यासह पुण्यातून आपल्या मोटर कारने आपल्या गावी येण्यासाठी निघाले होते. तथापि सकाळी पहाटे किणी घुणकी जवळ आले असता त्यांच्या कारला अपघात झाला. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता बदलण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकाला धडकून नजीकच्या झाडाला जाऊन आदळली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. सुभाष पाटील यांच्या डोक्याला अधिकच मार लागल्यामुळे त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment