विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असते....! -डॉ जे बी पाटील, मुख्या. श्रीकांत सुबराव पाटील यांचा सेवानिवृत्ती गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2024

विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असते....! -डॉ जे बी पाटील, मुख्या. श्रीकांत सुबराव पाटील यांचा सेवानिवृत्ती गौरव

 

मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना मान्यवरांसह कोवाड केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक

कोवाड : सी एल वृत्तसेवा 

   कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री यांच्या पेक्षाही शिक्षकाचे स्थान सर्वोच्च मानले जाते. जगातील अनेक देशात हे संकेत पाळले जातात असे प्रतिपादन कमला कॉलेज कोल्हापूरचे निवृत्त प्राचार्य डॉ. जे बी पाटील यांनी केले. ते मराठी विद्यामंदिर जक्कनहट्टी, ता. चंदगड शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती गौरव कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

श्रीकांत पाटील यांचा सत्कार करताना माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील आदी मान्यवर 

   म्हाळेवाडी (ता. चंदगड) गावचे सुपुत्र श्रीकांत पाटील हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक गौरव समारंभ पद्मश्री रणजीत देसाई सांस्कृतिक भवन कोवाड येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे स्वागत नारायण सुबराव पाटील व शाळा व्यवस्थापन समिती जक्कनहट्टी यांनी केले. प्रास्ताविकातून केंद्र समन्वयक विलास पाटील यांनी श्रीकांत पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्राचार्य डॉक्टर जे बी पाटील यांच्यासह, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, उद्योजक नरसू भरमू पाटील, सह्याद्री शिक्षण संस्था चिपळूणचे माजी मुख्याध्यापक एम के पाटील, चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंत जोशीलकर, शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, शिक्षक समिती अध्यक्ष धनाजी पाटील, कु अस्मिता श्रीकांत पाटील, जे बी शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. 
   

    यावेळी म्हाळेवाडी चे सरपंच सी ए पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, जक्कनहट्टी, घुलेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच युवराज पाटील, उपसरपंच शांता पाटील, केंद्र प्रमुख बी एस शिरगे, सुधीर मुतकेकर आदींसह चंदगड तालुका व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कोवाड केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, म्हाळेवाडी, जक्कनहट्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला कुंभार व रेडेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment