कालकुंद्री येथील वास्तुशांती कळसारोहन होणारे नियोजित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे भाविकांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी भव्य मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन कार्यक्रम गुरुवार दि. ९ मे ते शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांचे अनावरण दि २ मे रोजी ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील होते. प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी सरपंच सौ छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील सर्व ग्रामपं. सदस्य, श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटी, मंदिर बांधकाम कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी (९ मे) मुहूर्तमेढ, देवदेवतांना आवाहन, ग्रामदैवत अभिषेक, कळस व मूर्ती मिरवणूक, विना पूजा, गणेश पूजन, गोमाता पूजन, जलाधिवास, धान्याधिवास, मंडप पूजन, वरूण देवता पूजन, पर्णकुटी पुजन आदी कार्यक्रम असून मिरवणुकीची सुरुवात विठू माऊली मंदिर कोवाड ता. चंदगड येथून सकाळी १० वाजता होणार असून ती कागणी मार्गे कालकंद्री येथे पोहोचेल.
दुसऱ्या दिवशी (१० मे) सकाळी ६ वाजता होम हवन- पूर्णाहुती, श्री जडेसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (हिरेमठ दोडवाड) यांच्या हस्ते मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहन, तुळस पुजन, मंदिर चौकट, गाभारा, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूजन, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांचे शिल्प पूजन. दुपारी १२ वाजता विठ्ठल महाराज फड पंढरपूर यांचे कीर्तन व मंदिर लोकार्पण. दुपारी ३ वाजता माहेर वाशिणींचा हळदी कुंकू मेळावा. ६ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजता तेजम महाराज वाटंगी यांचे कीर्तन व जागर भजन.
तिसऱ्या दिवशी (दि. ११) सकाळी ५ वाजता काकड आरती, ७ वाजता कला कीर्तन, ९ वाजता माऊली अश्वरिंगण सोहळा, उभे रिंगण व गोल रिंगण तर दुपारी ११ ते ४ महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता आदिनाथ पाटील (किटवडे) व कु अश्विनी पाटील (घुल्लेवाडी) यांचे सुगम संगीत गायन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसातील सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कलमेश्वर भक्त मंडळ यांच्या वतीने अध्यक्ष पद्माकर पाटील उपाध्यक्ष पुंडलिक जोशी खजिनदार अशोक जोशी व सचिव सुभाष कृष्णा पाटील आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment