मनसेचे महादेव जांभळे यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2024

मनसेचे महादेव जांभळे यांना पितृशोक

 

रामू यल्लाप्पा जांभळे

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      कागणी (ता. चंदगड) येथील रामू यल्लाप्पा जांभळे (वय 86) यांचे शनिवारी (दि. 4) रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातजावई, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई उपनगर विभागाचे चिटणीस महादेव जांभळे यांचे ते वडील. तर  ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील गोविंद पांडुरंग बोकडे यांचे ते सासरे होत. शिनोळी (ता. चंदगड) येथील रोहित ॲग्रो ट्रेडर्सचे राजू कोकीतकर हे त्यांचे नातजावई आहेत.

रक्षाविसर्जन सोमवारी दि. 6 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

No comments:

Post a Comment