![]() |
प्रा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ संपर्क दौरा प्रसंगी भरमूआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, संग्राम कुपेकर आदींसह कार्यकर्ते |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गटाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती पुरस्कृत अधिकृत उमेदवार प्रा. संजय सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रचारार्थ कर्यात भागात संपर्क दौरा काढण्यात आला. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, भाजप चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील, भाजप निमंत्रित सदस्य संग्रामसिंह कुपेकर, भाजप युवा आघाडी प्रमुख भावकु गुरव आदींनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात मतदार संपर्क दौरा पूर्ण केला. चन्नेटी, राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक, तळगुळी, कालकुंद्री, कागणी आदी गावांत कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात आले. यावेळी भरमू तातोबा पाटील, पुरूषोत्तम सुळेभावकर, बाजीराव पाटील, शिवाजी कोकितकर, अभिषेक कोरे, नामदेव पाटील, शंकर सांबरेकर आदींसह विविध गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment