माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने मतदार जागृती अभियान, शपथ व रॅली - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2024

माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने मतदार जागृती अभियान, शपथ व रॅली

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज मतदार जागृती अभियान, शपथ व रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकरी व कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी स्वयंसेवक व स्टाफला प्रथम मतदान जागृतीची शपथ दिली.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी मतदान केंद्रावर स्वयंसेवकांनी काळजीपूर्वक व शिस्तीने सेवा बजावण्याचे आवाहन केले. मतदार जागृतीसंबंधी  सविस्तर मार्गदर्शन केले. आभार डॉ. एन. के. पाटील यांनी मानले. त्यानंतर रॅली काढण्यात आली.

No comments:

Post a Comment