बेळगाव- वेंगुर्ले रोडवर कार्वे नजीक झालेल्या अपघातात एक ठार - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2024

बेळगाव- वेंगुर्ले रोडवर कार्वे नजीक झालेल्या अपघातात एक ठार

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      बेळगाव वेंगुर्ले राज्य मार्गावर मजरे कार्वे (ता चंदगड) नजीक झालेल्या दुचाकी अपघातात यशवंतनगर (ता. चंदगड) येथील रहिवाशी रवींद्र प्रभाकर सबनीस (वय ६५) यांचा मृत्यू झाला. ही घटना ५ मे २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हंजीगोळ ओढ्या नजीक घडली. 

यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, कालकुंद्री, (ता. चंदगड) येथील निखिल हेमंत कांबळे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने भरधाव वेगात दुचाकी चालवून सबनीस यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशी फिर्याद अरुण जोतिबा पवार वय ४५, रा. यशवंतनगर यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून निखिल कांबळे याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०४अ,२७९, ३३७, ३३८ सह मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ पाटील करत आहेत. दरम्यान या अपघातातील वाहन चालक निखिल कांबळे हा सुद्धा जखमी झाल्याचे समजते.

No comments:

Post a Comment