कोवाड येथे ९ मे रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान, पै संदीप मोटे विरुद्ध कौतुक डाफळे प्रथम क्रमांकाची लढत - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2024

कोवाड येथे ९ मे रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान, पै संदीप मोटे विरुद्ध कौतुक डाफळे प्रथम क्रमांकाची लढत



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   कोवाड तालीम संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने खास अक्षय तृतीया शिवजयंती निमित्त गुरुवार दिनांक ९ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजता रणजीत नगर- कोवाड (ता. चंदगड) येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै संदीप मोटे सांगली विरुद्ध कोल्हापूर महापौर केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै कौतुक डाफळे कोल्हापूर यांच्यात रंगणार आहे.
  आखाडा पूजन पै शंकर पाटील वस्ताद, कल्लाप्पा चोपडे व अजित व्हन्न्याळकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, गोपाळराव पाटील, उद्योगपती रमेश रेडेकर, ओलम हेड भरत कुंडल, अथर्व शुगर चेअरमन मानसिंग खराटे, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
   दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण कोल्हापूर विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी हितेश पाटील पुणे, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे कंग्राळी विरुद्ध अतुल डावरे मोतीबाग तालीम कोल्हापूर, चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन सुदर्शन पाटील (कोल्हापूर क्रीडा संकुल) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शिनोळी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन रुपेश धर्मोजी (कोवाड) विरुद्ध अतुल नाईक सांगली यांच्यात होणार आहे. याशिवाय कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ५४ कुस्त्यांसह मैदानाचे आकर्षण असलेल्या २ जंगी मेंढ्यांसाठी पार्थ पाटील (कंग्राळी) विरुद्ध साहिल शेख (शाहू आखाडा कोल्हापूर) तर शुभम पाटील (तेऊरवाडी) विरुद्ध नितीन पाटील (कंग्राळी) यांच्या त होणार आहे. मैदानात कुस्ती निवेदक व समालोचक कृष्णात चौगुले (राशिवडे) तर रणहलगी वादक हनुमंत घुले (सांगाव) यांचे आकर्षण राहणार आहे. कुस्ती शौकिनाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालीम संघ व बलभीम व्यायाम मंडळ कोवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment