मराठा सेवा संघ प्रणित सर्व कक्षांची उद्या २० जूनला कोल्हापूरात बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2024

मराठा सेवा संघ प्रणित सर्व कक्षांची उद्या २० जूनला कोल्हापूरात बैठक

 


कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा 

       कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा सेवा संघ व मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आदी सर्व कक्षांच्या आजी-माजी पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, सभासद व कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापूर येथे बोलवण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता सर्किट हाऊस, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मराठा सेवा संघाचे माजी प्रदेश महासचिव व ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री मधुकरराव मेहकरे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व कक्षांच्या आजी-माजी पदाधिकारी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माहिपती बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


 .

No comments:

Post a Comment