टेम्पो - दुचाकी अपघातात दोघे ठार, बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर हिंडगाव फाटा नजीक घटना - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2024

टेम्पो - दुचाकी अपघातात दोघे ठार, बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर हिंडगाव फाटा नजीक घटना

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा

     भरधाव दुचाकीने टेम्पोला धडक दिल्याने दुचाकी वरील दोघे जण ठार झाले. ही घटना बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावरील हिंडगाव फाटा नजीक काल मंगळवार दिनांक १७ रोजी दुपारी घडली. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.

     घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी, मलिक खतालसाब मुजावर, वय २२ (रा. मुतगा, ता. बेळगाव) आणि दौलत खतालसाब मोमीन, वय 22 (रा. पंत बाळेकुंद्री, ता. बेळगाव) हे दोघे मित्र मोटर सायकल वरून पर्यटनासाठी अंबोलीकडे निघाले होते. याचवेळी कानूर बुद्रुक येथून सिमेंटची पोती उतरून एक मालवाहू टेम्पो बेळगावच्या दिशेने येत होता. भरधाव वेगात मोटरसायकल चालवणाऱ्या मलिक याचे वळणावर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या टेम्पोला त्यांची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की मलिक मुजावर हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत बेळगाव येथील रुग्णालयात दाखल केलेल्या दौलत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत मलिक हा कार मेकॅनिक तर दौलत मोमीन रिक्षा चालक होता. 

     सोमवारी बकरी ईद साजरी करून हे दोघे अन्य मित्रांसोबत दुचाकी वरून आंबोली येथे पर्यटनासाठी चालले होते. तथापि तिथे पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झाला घातला. याबाबत चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment