कर्नाटकात पेट्रोल व डिझेल दरात सरासरी ३ रुपयांची वाढ - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2024

कर्नाटकात पेट्रोल व डिझेल दरात सरासरी ३ रुपयांची वाढ

 


बेळगाव : सी एल वृत्तसेवा
      लोकसभा निवडणूक निकालानंतर लागलीच कर्नाटकातील काँग्रेस प्रणित सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात सरासरी ३ रुपयांनी वाढ केली आहे.  दिनांक १५ जून २०२४ पासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
      कर्नाटक राज्य सरकारच्या सूचनेनुसार पेट्रोल वरील कर २५.९२% वरून २९. ८४% इतका झाल्याने पेट्रोलचे दर ३ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेल विक्रीवरील कर १४.३% वरुन १८.४% इतका वाढल्याने दरात ३ रुपये ५ पैशांनी वाढ झाली आहे. 
     महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पेट्रोल दरात यापूर्वी मोठी तफावत होती. ती कर्नाटकातील दरवाढीमुळे काही प्रमाणात कमी झाल्याने पेट्रोल व डिझेल खरेदीसाठी कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंपावर जाणारे महाराष्ट्रातील ग्राहक आता महाराष्ट्रातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी पसंती देतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment