बेळगाव येथे 22 जून रोजी भव्य रोजगार मेळावा, 50 कंपन्यांचा सहभाग, बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2024

बेळगाव येथे 22 जून रोजी भव्य रोजगार मेळावा, 50 कंपन्यांचा सहभाग, बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

      रोटरी क्लब ऑफ वेनुग्राम बेळगाव व स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव सीमा भाग व चंदगड, आजरा, गडहिंग्लज परिसरातील बेरोजगार तरुणांसाठी 'रोटरी मेगा जॉब फेयर 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. दि 22 जून 2024 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत हा मेळावा ज्योती कॉलेज क्लब रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. 

   हा रोजगार मेळावा निःशुल्क असून यात विविध 50 कंपन्या सहभागी होणार आहेत. इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट (नवीन व अनुभवी) नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन रोटरी क्लब बेळगावच्या वतीने निवृत्त नौदल अधिकारी व रोटरी क्लब वेणू ग्राम बेळगावचे माजी अध्यक्ष अशोक पाटील (मुळगाव कालकुंद्री, ता. चंदगड) यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment