चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
सन २०२४ मध्ये झालेल्या इ १०वी च्या परीक्षेत तालुक्यातील मराठी विषयात ९५ गुण मिळविलेल्या विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २३ जून रोजी सकाळी ९ वा. श्रीराम विद्यालय कोवाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुण पत्रकाची झेरॉक्स सोबत आणावी. बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विषय शिक्षक व पालक उपस्थित राहावे असे आवाहन अध्यापक संघाचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिवणगेकर व फिरोज मुल्ला यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment