विमा सल्लागार दयानंद पाटील यांना MDRT (USA) चा बहुमान - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2024

विमा सल्लागार दयानंद पाटील यांना MDRT (USA) चा बहुमान

दयानंद पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता.चंदगड) येथील LIC चे विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यांनी MDRT (USA) 2025 चा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यांना दि. 22 ते 25 जुन 2025 रोजी अमेरिका येथील मियामी बीच, फ्लोरिडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रत्यक्ष सहभागी होणारे चंदगड,आजरा, गडहिंग्लज उपविभागातील एकमेव प्रतिनिधी ठरले आहेत.

      द मिलियन डॉलर राउंड टेबल (MDRT) ही एक जागतिक आणि स्वतंत्र संघटना आहे जी 'जीवन विमा आणि वित्तीय सेवा' उद्योगातील जगातील सर्वोत्तम विक्री व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते. गेली 21 वर्षे ते विमा व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 2 वेळा COT (एका वर्षात 3 वेळा MDRT) व एकूण 14 वेळा MDRT चा बहुमान मिळवला आहे. असा बहुमान मिळवणारे चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव सीमा भागातील ते एकमेव विमा सल्लागार आहेत.

      ग्रामीण भागात विमा व्यवसाय करणे तसे आव्हानात्मक असले तरी त्यांनी ग्रामीण भागात विम्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोवाड व बेळगाव येथे सुसज्ज कार्यालय सुरू केली. उत्कृष्ट सेवा व सल्ला देण्यात त्यांचा हातखंडा आहे. या कामी त्यांना वरिष्ठ अधिकारी विनायक गायतोंडे, किरण अवचिते, सनंदन गायकवाड व विकास अधिकारी अरुण उबाळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment