चिंचणे येथे वृक्षारोपन करताना युवा चेतना संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ |
तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
चिंचणे (ता. चंदगड) येथे गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम युवा चेतना बहुउदेदशीय सामाजिक सेवा संस्था चिंचणे यांच्या मार्फत करण्यात आला. काजू, आवळा, चिंच अशा ५०१ रोपांचे वाटप संस्थेचे संस्थापक सचिन दत्तु चिंचणेकर, संस्थेचे अध्यक्ष महेश पांडुरंग बागडी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी विशाल तळवार ,सचिव सागर चिंचणेकर, खजिनदार जनार्दन बामणे, कार्याध्यक्ष अविनाश बुवा, तसेच संस्थेचे सदस्य किरण व्हकंळी, विष्णू सुतार, महेश कांबळे, तानाजी तळवार, बसवराज मांग यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी लक्ष्मण पाटील, रामा गुंजगी, नारायण पाटिल, गावचे सरपंच संतोष पाटिल ग्रामपंचायत सदस्य सागर चिंचणेकर, माजी उपसरपंच किरण पाटील, माजी सदस्य विष्णू तळवार, ताम्रपर्णी दुध संस्था चेअरमन नामदेव कांबळे, प्रगती दुध संस्था चेअरमन विजय मांग, अमृत बुवा, राजु सुतार, सागर सुतार, प्रदीप गुंजगी, बसवाणी हिरेमठ तसेच महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment