चंदगड तालुक्यात अतिवृष्टीने घरांची पडझड सुरुच, चंदगड तिलारी मार्ग पाण्याखाली...! - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2024

चंदगड तालुक्यात अतिवृष्टीने घरांची पडझड सुरुच, चंदगड तिलारी मार्ग पाण्याखाली...!

मौजे कोवाड मसणु सुतार यांच्या शेतातील घराची भिंत पडुन अंदाजे 35000/- रुपये नुकसान झाले आहे.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   चंदगड तालुक्यात गेल्या ८-१० दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यात गेल्या २४ तासात पुन्हा भर पडली आहे. तालुक्यातील अनेक घरे व घरांच्या भिंती कोसळल्या यात कोवाड येथील मष्णू सुतार यांच्या शेतातील घराची भिंत पडुन अंदाजे ३५ हजार रुपये नुकसान झाले आहे.

मौजे कानूर बू येथील सुरेश धाकलू नाईक यांच्या घराची भिंत कोसळून अंदाजे 10000 इतके नुकसान झाले आहे

     सुंडी येथील प्रकाश नारायण देसाई यांच्या घराची भिंत पडून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कानूर बुद्रुक येथील सुरेश धाकलू नाईक यांच्या घराची भिंत कोसळून अंदाजे १० हजार रुपये इतके नुकसान झाले आहे.

थंडी येथील प्रकाश नारायण देसाई यांच्या घराची बिन भिंत पडून अंदाजे 30 हजाराचे नुकसान

     वरील पडझडीच्या घटनांचे पंचनामे संबंधित तलाठी कार्यालय, पोलिस पाटील व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून बाधित नागरिकांनी शासनाकडून योग्य भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

      दरम्यान चंदगड तालुक्याच्या सर्वच भागात धुंवाधार पर्जन्यवृष्टी सुरू असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर चंदगड- तिलारी रस्ता व पूल पाण्याखाली गेला असून चंदगड ते हेरे, पाटणे, तिलारी, पारगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक ३० किलोमीटरचा अधिकचा फेरा मारून पाटणे फाटा मार्गे सुरु आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास महापुराचे संकट भेडसावत आहे.

No comments:

Post a Comment