चंदगड / प्रतिनिधी
"दोन दशकांहून अधिक काळ दरवर्षी नियमितपणे देशी वृक्षांची वृक्षलागवड करित वृक्ष चळवळ जागविणाऱ्या जागर फाउंडेशनचे कार्य आदर्श आहे," असे प्रतिपादन करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी जागर फाउंडेशनमार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी केले. गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दसरा चौक परिसरामध्ये तहसीलदार रावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
यावेळी कोल्हापूर प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, सरपंच अश्विनी शिरगावे, जागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी विचार मांडले. प्रास्ताविक भीमराव गोंधळी यांनी केली. कार्यक्रमासाठी सुबराव पवार (होसुर), जितेंद्र यशवंत, जमाल मुल्ला, अर्जुन गोंधळी, रंगराव चौगुले, प्रवीण शेजवळ, आदित्य दाभाडे, अर्जुन कांबळे, अशोक गवळी, शिवाजी कांबळे , ओंकार पाटील, राजा जाधव, वैशाली गवळी व नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment