कालकुंद्री येथील विलास शेटजी यांना मातृषोक - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2024

कालकुंद्री येथील विलास शेटजी यांना मातृषोक

श्रीमती पद्मा वसंत शेटजी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती पद्मा वसंत शेटजी यांचे आज मंगळवार दि. २३/०७/२०२४ रोजी सकाळी ६ वाजता वयाच्या ८३ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  

  कालकुंद्री ग्रामपंचायत सदस्य व कला महाविद्यालय कोवाड चे क्लार्क विलास वसंत शेटजी, सराफ व्यावसायिक विकास वसंत शेटजी यांच्या त्या मातोश्री तर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कै वसंत धोंडीबा शेटजी/ सोनार यांच्या पत्नी होत्या. कालकुंद्री येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. 

No comments:

Post a Comment