चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अनिल नयनसुख धुपदाळे (चंदगड, ता. चंदगड) यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. ते गेली ३५ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी विविध दैनिकांत पत्रकार म्हणून कार्य केले आहे. चंदगड तालुक्यात एक निर्भीड पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्यकारिणी कडून ही निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सर्वेसर्वा व मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, परिषदेचे राज्य अध्यक्ष शरद पाबळे, राज्य डिजीटल मिडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या नुसार कोल्हापूर जिल्हा डिजीटल मिडियाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र धुपदाळे यांना प्रदान करण्यात आले. ही निवड एक वर्षासाठी असून या काळात आपल्या पदाचा योग्य वापर करून कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया संघटनेची ताकद वाढवावी. अशा शुभेच्छा निवडपत्राद्वारे देण्यात आले आहेत.
निवडी बद्दल चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment