![]() |
संगीता पाटील प्रकाश बोकडे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शारदा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित बसर्गे कार्यालय पाटणे फाटा (ता. चंदगड) या संस्थेच्या सन 2024-25 ते सन 2029 पर्यंत संस्थेच्या चेअरमन पदी धनंजय विद्यालयाच्या प्राचार्या सौ संगीता पाटील यांची निवड करण्यात आली तर व्हा. चेअरमन पदी बागिलगे ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक प्रकाश बोकडे यांची निवड करण्यात आली. ही निवड सहाय्यक निबंध कार्यालय चंदगडचे वरिष्ठ सहाय्यक एस. व्ही. सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली.
सुरुवातीला उपस्थिताचे स्वागत संस्थापक जे. बी. पाटील यांनी करुन संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चेअरमन पदी सौ. संगीता पाटील यांचे नाव संचालक डी. डी. बेळगावकर यांनी सुचवले. त्याला प्रा. डी. एस. जगधने यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदी प्रा. प्रकाश बोकडे यांचे नाव प्रा. अशोक चिमणे यांनी सुचवले. त्याला प्रा. कल्पेश शिंदे यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक व्ही. बी. व्होडगे, जे. जे. कोकितकर, सुरेश पिटूक, सौ. वर्षा पाटील, टी. एस. चाळक, सटुप्पा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक राजेंद्र शिवनगेकर यांनी केले तर आभार मानद सचिव गंगाराम पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment