नागेश चौगुले |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंगचे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट करावे. यातील बेकायदेशीर व धोकादायक होर्डिंग काढून टाकावेत अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना नुकतेच देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडहिंग्लज शहरात एकूण ४५ होर्डिंग्ज होती त्यापैकी २५ होर्डिंग्ज बेकायदेशीर असल्याचे गडहिंग्लजचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सोमवार दि. ८ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. कायदेशीर बाबी तपासून नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणारी मुदत कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले. तथापि या २० पैकी काही होर्डिंग धोकादायक स्थितीत उभे आहेत. या होर्डींग्ज चे खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट झाले असल्याने यात शंकेला वाव आहे. शहरातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावरील होर्डिंग हे लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणारे आहे. तरी मुख्याधिकारी यांनी बैठकीत सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता आणि नगर परिषदेचे नगर अभियंता यांनी संयुक्त ऑडिट येत्या दोन-तीन दिवसांत आमच्या उपस्थितीत हे ऑडिट झाले पाहिजे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाप्रमाणे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत शहरातील सर्व होर्डिंग वापरणे बंद करावे. अशी मागणी गडहिंग्लज शहरातील नागरिकांच्या वतीने आम्ही करत आहोत. हे ऑडिट वेळेत न झाल्यास मनसेच्या वतीने नगरपालिकेवर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति माहितीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर व मुख्याधिकारी नगरपरिषद गडहिंग्लज यांना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment