चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2024

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली. प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अनेक उपयुक्त व औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. यावेळी व ड, पिंपळ, कुंभा, हिरडा, बेहडा, फणस, आंबा, चिंच, जांभूळ, करंज या वृक्षासोबतच वनौषधी वनस्पतीचीही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. 

        प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे सांगितले. यावेळी वृक्षारोपण समितीचे समन्वयक प्रा. व्ही. के. गावडे यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व विशद केले. तसेच सदयस्थितीत सह्याद्रि पर्वत रांगेतील वनसंपदा व वन्यजीव धोक्यात येत आहे. वृक्षामुळे जमिनीची धूप कमी होते. पावसाचे प्रमाण चांगले राहते. प्राण्यांचा अधिवास टिकून राहतो. सर्वांनीच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध व्हावेअये मत व्यक्त केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. के. एन. निकम, डॉ. ए. पी. पाटील, शिवराज हसुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment