चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथपाल दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2024

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथपाल दिन साजरा

 

चंदगड / प्रतिनिधी

        येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याधापक एन. डी. देवळे होते. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन टी. एस. चांदेकर यांनी केले. भारतीय ग्रंथ शास्त्र विषयाचे प्रमुख पद्मभूषण डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म दिवस ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी ग्रंथपाल शरद हदगल यांनी विविध विषयावर ग्रंथप्रदर्शन भरविले होते.'वाचनाने व्यक्तीमत्व घडतात. ग्रंथामुळेच आपले जीवन समृद्ध होते. ' असे प्रतिपादन प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले. कार्यक्रमाला तानाजी बेरडे,तानाजी खंदाळे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे उपस्थित होते.सुत्रसंचालन एस. जी. साबळे यांनी केले तर आभार ग्रंथपाल श्री हदगल यांनी मानले.

No comments:

Post a Comment