चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथे पंचायत समितीत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण गट विकास अधिकारी बाळासाहेब भोगे यांच्या हस्ते झाले. यावेळी कन्या विद्या मंदिर च्या विद्यार्थिनींनी व श्रीपती कांबळे यांनी देशभक्तीपर गिते सादर केली. यावेळी पंचायतयावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील व पंचयत समितीचे सर्व खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
करेकुंडी (ता. चंदगड) येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात
आला. ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण एकाच मैदानात करण्यात आले.
ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच पूनम पावले यांच्या हस्ते तर शाळेचे
ध्वजारोहण मुख्याध्यापक सोनाप्पा कोकितकर यांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थ्यांनी
ध्वजगीत व समूहगीते सादर केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या
तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना शाळा व्यवस्थापन समिती व
ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश देवण यांचा सपत्नीक सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक सोनप्पा कोकितकर यांनी
केले. अध्यापक रामलिंग तुपारे यांनी आभार मानले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष पांडुरंग सुतार, उपाध्यक्ष भरमा
शेनोळकर, उपसरपंच अमित हुद्दार, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कदम, पोलीस
पाटील उमेश देसाई, चंदगडचे कृषी सहाय्यक किरण पाटील, ग्रामसेवक गीता गिरी,
परशराम पाटील, विश्वनाथ बोकडे, अमोल देवण, संभाजी चव्हाण, प्रकाश गडकरी,
सचिन पाटील, गजानन पाटील, अनिल मोरे, सुरेश चव्हाण, सुजाता नाईक, सुमन
भातकांडे, अध्यापिका सीमा पाटील आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
चंदगड येथील शासकिय-निमशासकीय पतसंस्थेत ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण संस्थाध्यक्ष अनिल
जाधव यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी व्यवस्थापक रविंद्र
जांभळे,व्यवस्थापक प्रदीप कुंभार, एस एल पाटील, नंदकुमार ढेरे, उज्वल
देसाई, दत्ता खाडे, विलास गावडे, विलास चव्हाण, नितेश मोरे आदी सह
कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत
विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ
विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी येथे ७८ व्या
स्वातंत्र्यदिनानिमित्त दौलत विश्वस्थ संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील
यांचे शुभ हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय
पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, उपप्राचार्य
प्रा. आर. बी. गावडे कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे यांचेसह सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्रा. कैवल्य काळे यांनी केले.
जांबरे (ता. चंदगड) चंदगड येथील ग्रामपंचायती मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन
उत्साहात संपन्न झाला.ज्येष्ठ नागरिक अनंत रामा गावडे यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायती मध्ये बांधण्यात आलेल्या नवीन
सभागृहाचे उद्घाटन लक्ष्मण विश्राम गावडे उद्योजक,(संयोजक महाराष्ट्र राज्य
उद्योग सेवा समिती) यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सरपंच विष्णू
गावडे, उपसरपंच रामकृष्ण गावडे, ग्रामसेवक अश्विनी कुंभार , पोलीस पाटील
जानकू गावडे, ग्रामपंचायत सदस्य गणपती ,कांबळे समृद्धी
नाटलेकर,श्री.गोरे,श्री.तिडके, गजानन गावडे ,विठ्ठल गावडे, मारुती गावडे
,संभाजी कांबळे, विजय गावडे ,विष्णू देवणे, तुकाराम गावडे ,संतोष गावडे
,विश्वनाथ गावडे,अनंत कांबळे, गुंडू कांबळे, दीपक नाटलेकर, शाळा व्यवस्थापन
कमिटी,महिलावर्ग, युवा वर्ग विद्यार्थी वर्ग व नागरिक उपस्थित होते.
डोंबिवली येथील श्रीमती जीआरसी हिंदी हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस
उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण अनंतम चे अध्यक्ष भगवान राघव
यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ३१४२ चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी
प्रशांत आंबेकर , रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजन्सी अनंतम चे सेक्रेटरी योगोश
तिवारी, प्रोजेक्ट डायरेक्टर ब्रजेश पांडे,प्रोजेक्ट चेअर विना जोशी, को
चेअर प्रकाश मोरे, खजिनदार सोवेन बॅनर्जी, जॉइंट सेक्रेटरी शशिकांत माने ,
क्लब चे मेंटर विकी नागदेव उपस्थीत होते.डिस्टिक्ट सेक्रेटरी प्रशांत
आंबेकर आणि विविध कला सादर करणाऱ्या मुलांचे व शिक्षका चे कौतुक केले व
त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी अनंतम
तर्फे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना आल्पोहार चे वाटप करणयात आले.
No comments:
Post a Comment