आप्पाजी मोरे |
प्रभा भास्कर |
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
विद्यामंदिर राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील शाळा व्यवस्थापन कमिटीची नुकत्याच झालेल्या पालक मेळाव्यात निवड करण्यात आली. नवीन कमिटीच्या अध्यक्षपदी आप्पाजी कल्लाप्पा मोरे, उपाध्यक्षपदी सौ.प्रभा आ. भास्कळ तर सदस्य म्हणून संदीप कृष्णा मोरे, सचिन चु. गुरव, महालिंग गस्ती, दशरथ कडोलकर, रेणुका बा. भोसले, संपदा सं. पाटील, विद्या उ कडोलकर, निर्मला सु. कांबळे यांची निवड करण्यात आली. पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल डुक्कुरवाडकर होते.
मुख्याध्यापका सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. शाळा व्यवस्थापन कमिटी स्थापन करण्याचे उद्देश, कामे व शाळेच्या प्रगतीत कमिटीची भूमिका याबाबत भैरू भोगण यांनी माहिती दिली. शाळा व्यवस्थापन कमिटी पुनर्गठण विषयक शासन परिपत्रकाचे वाचन अंकुश कुंभार यांनी केले. निवड झालेल्या सदस्यांतून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नेमणूक करण्यात आली. पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. संध्या संजय सोनार यांनी सूत्रसंचालन केले. नबीसाहब उस्ताद यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परशराम बाबू नाईक, के के पाटील आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment