कालकुंद्री येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2024

कालकुंद्री येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     कालकुंद्री (ता. चंदगड) येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कालकुंद्री येथे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मुतकेकर यांच्या हस्ते तर श्री कलमेश्वर विकास सेवा संस्था येथे संचालक शिवाजी कृष्णा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. 

      केंद्रीय प्राथमिक शाळा व श्री सरस्वती विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व समूहगीत सादर केले. ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्या विजया कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक दत्ता नाईक यांनी आभार मानले. यावेळी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते. सेवा संस्थेच्या ध्वजारोहण प्रसंगी संचालक अरविंद कोकितकर यांनी स्वागत केले तर व्हाईस चेअरमन प्रताप पाटील यांनी आभार मानले. यावेळी चेअरमन अशोक पाटील सर्व संचालक, कर्मचारी, आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या वतीने मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी, दहावी व बारावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

     याशिवाय श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार जुनियर कॉलेज तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा येथेही ध्वजारोहण उत्साहात पार पडले.

No comments:

Post a Comment