महिला सबलीकरणासाठी प्रयत्न व्हावेत - उद्योजक मानसिंग खोराटे यांच्याकडे महिलांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2024

महिला सबलीकरणासाठी प्रयत्न व्हावेत - उद्योजक मानसिंग खोराटे यांच्याकडे महिलांची मागणी


चंदगड / प्रतिनिधी

     आजरा चंदगड हा विधानसभा मतदारसंघ हा शेतीप्रधान आहे. काजू व्यवसाय वगळता अन्य कोणाताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही.‌ याबाबत आजरा तालुक्यातील व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोळीद्रे जि. प. मधील महिलांनी सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या वतीने मागणी केली आहे. याबाबत उद्योजक मानसिंग खोराटे यांनी योग्य मार्गदर्शन करत लवकरच आपण महिला सबलीकरण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 

       मतदार संघातील तरुणी - तरुणांसाठी नोकरी व्यवसाय, व वेगवेगळे उद्योग मिळावे व उद्योग मिळावे हा उपक्रम लवकरच हाती घेऊन मतदारसंघात प्रत्येक गावात बेरोजगार तरुणांना नोकरी व उद्योग मिळावे. यासाठी यापूर्वी देखील १००० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले आहे. असे बोलताना म्हणाले. यावेळी सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या वतीने भावी व्यावसायीक, सामाजिक, व राजकीय वाटचालीस पाठिंबा असल्याचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. 

        यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कांबळे, उपाध्यक्ष निता बोलके, सचिव अर्चना देसाई सदस्य ज्योती कांबळे रेखा परिट, मुस्कान शेख, सरिता कांबळे सह संस्थेच्या उपशाखेच्या पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment