कुदनूर : सी एल वृत्तसेवा
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी या विद्यालयात राखी बनवणे कार्यशाळा संपन्न झाली. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारातून राख्या विकत घेण्यापेक्षा आपणच त्या विद्यालयात बनवल्या तर आपल्याला पैशाची बचत करता येईल व कलात्मक आनंदही मिळेल ही संकल्पना हा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींच्या वेगवेगळ्या वर्गांना व गटांना विशिष्ट प्रकारच्या राख्या बनवण्याची जबाबदारी देऊन प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. यातून सुंदर राख्या आकारास आल्या. बाजारात मिळणाऱ्या राख्यांशी स्पर्धा करू शकतील इतक्या सुंदर राख्या बनवल्या गेल्या. या राख्या विकून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवा आणि शिका ही संकल्पना कृतीत आणल्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे.
याकामी कलाशिक्षक एस. डी. गावडे, सांस्कृतिक विभागाचे बी. एन. पाटील, एम. ए. पाटील, एम. के. पाटील, आर. एच. शिवनगेकर शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक पी. एन. यळ्ळूरकर, पर्यवेक्षक एस. ए. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment