चंदगड : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सट्टूपा टक्केकर जुनिअर कॉलेज येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण गावातील जेष्ठ नागरिक पुंडलिक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल अनुक्रमे पियुष पाटील, पल्लवी पाटील, पूजा सुतार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ही बक्षिसे शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. वैजू नागो कलखांबकर यांच्याकडून आपल्या आईच्या स्मरणार्थ देण्यात आली. तसेच सारथी शिष्यवृत्तीधारक प्रांजल बोकडे, प्रथमेश तुळसकर, साक्षी पाटील, विघ्नेश कांबळे, वैष्णवी कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याद्यापक एन जी यळ्ळुरकर, सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विलास कांबळे, संस्थेच्या सदस्या शांता टक्केकर, सरपंच सुस्मिता पाटील, उपसरपंच, पोलीस पाटील, सेवा सोसायटी, दूध संस्था, आजी- माजी सैनिक, तरुण मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment